” मूर्ती लहान पण कीर्ती महान”; IAS अधिकारी आरती डोगरा यांची कहाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेथे इच्छा आणि आकांक्षा मोट्या असतात तेथे जिद्ध आपोआपच मदत करते असते. जिद्दीच्या जोरावर माणसं अनेक अडचणींवर मात करत आपलं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात यश प्राप्त करत असतात.अशीच एक संघर्षमय कहाणी राजस्थानमधील जिल्हाधिकारी यांची आहे.

आरती डोगरा या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या उंचीने फार कमी आहेत. त्यांची उंची साधारण ३ फूट ६ इंच आहे. परंतु त्यांनी आपल्या यशासमोर त्यांनी आपली आव्हाने ठेंगणी केली आहेत.देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामधील एक उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आपली उंची कमी असूनही स्वतःमध्ये कधी नून्गड ना बाळगता आपले यश खेचून आणलं. समाजाने त्यांना णेव वेळा उंची लहान असल्याने हिणवलं पण त्याच समाजासाठी आणि समाजांतील परिवर्तनासाठी त्यांनी अनेक मॉडेल्स तयार केली आहे. त्यांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची कामगिरी आहे.

आरती यांचा जन्म उत्तरखंड येथे झाला. त्यांच्या जन्म झाला होता, त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोक मुलगी म्हंटल की खूप महत्व देत नव्हते त्यावेळी मुलगी म्हणजे समाजावर आणि घरातल्या व्यक्तींवर बोज आहे अशी समजूत होती. परंतु त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण घेऊ दिल आणि अधिकारी होण्याच्या स्वप्नंना अधिक बळ दिले.२००६ मध्ये त्यांनी IAS पद प्राप्त केल. डेहराडून मधील गर्ल्स स्कूल मध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीत येऊन त्यांनी लेडी श्रीराम महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी IAS ची तयारी करायला सुरुवात केली. कॉलज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या कॉलेज मध्ये IAS अधिकारी मनीषा यांचे भाषण ठेवले होते, त्यावेळी त्याच्याशी भेट झाली होती. मनीषा यांच्या प्रेरणेने आणि भेटीने आरती यांनी प्रशासकीय सेवत जाण्याचं पक्क केलं त्यानुसार त्यांनी तयारीला सुरुवात केली.

लहानपनापसून त्यांची उंची कमी असल्याने त्यांना समाजातून अनेक वेळा टोमणे ऐकावे लागले. अनके संकटांचा सामना करत जिद्ध च्या जोरावर अनके यशाची शिखरे पार करत upsc परीक्षा यशस्वीपणे पास केली.२००६ मध्ये पद मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम राजस्थान मधील बुंदी जिल्यात जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. तेथे असताना त्यांनी अनेक यशस्वी मॉडेल त्यांनी केंद्र सरकारसाठी बनवले होते. .त्यांना शासनाच्या केंद्र अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आता त्या सध्या अजमेर या भागात जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या प्रत्येक कृतीतून हेच निदर्शनास येते की , जिद्ध आणि त्यासाठी लढायची उमेद असेल तर अनेक समस्या आणि आव्हान ठेंगणी वाटायला लागतात. ही उमेद आणि इर्षा आजही आरती यांच्यात आहे आजही त्या तितक्याच धाडसाने आणि धडाडीने काम करताना दिसत आहेत. त्यांच्या कामाला आणि कर्तुत्वाला सलामच म्हणावं लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment