नवी दिल्ली । देशातील दोन बँकांनी आजपासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून आपला IFSC कोड बदलला आहे. आता या बँकांच्या ग्राहकांना कोणतेही ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी नवीन IFSC कोड टाकावा लागेल. लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांसाठी ही बातमी खूप उपयुक्त आहे. बँकेने 28 फेब्रुवारी रोजी त्यांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत.
डिजिटल बँकिंगसाठी ग्राहकांना IFSC कोड अनिवार्यपणे आवश्यक आहे. याशिवाय, ग्राहक आपल्या खात्यातून NEFT/RTGS/IMPS द्वारे पैसे पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. बँकेने 25 ऑक्टोबर 2021 पासून नवीन कोड ऍक्टिव्ह केले असले तरी, 28 फेब्रुवारीपासून जुन्या कोडचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ग्राहकांना आता 1 मार्चपासून पेमेंटसाठी नवीन कोड वापरावा लागणार आहे.
म्हणून IFSC कोड बदलला
नोव्हेंबर 2020 मध्ये लक्ष्मी विलास बँकेचे DBS बँकेत विलीनीकरण करण्यात आले. या विलीनीकरणानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत. 1 मार्चपासून बँकेच्या ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS साठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल. बँकेने ग्राहकांना या बदलाची माहिती शाखांमध्ये प्रत्यक्ष भेटून ईमेल आणि SMS द्वारे दिली आहे.
ग्राहकांनी ‘हे’ बदल करणे आवश्यक आहे
28 फेब्रुवारी 2022 नंतर, ग्राहकांनी आपल्या थर्ड पार्टीना जारी केलेले सर्व जुने धनादेश नवीन कोडसह चेकने बदलले पाहिजेत. 28 फेब्रुवारीनंतर जुना MICR कोड असलेले धनादेश नाकारले जातील. नवीन चेकबुक 1 नोव्हेंबर 2021 पासून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहक 1860 267 4567 या क्रमांकावर कॉल करून किंवा इंटरनेट/मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात.
लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक किंवा IFSC कोड मिळाले आहेत त्यांनी आपल्या वेगवेगळ्या थर्ड पार्टी संस्थांकडे अपडेट करावेत. ग्राहकांना अनेक ठिकाणी IFSC कोड अनिवार्यपणे अपडेट करावा लागेल. यामध्ये इन्कम टॅक्स, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि डिमॅट खाती यांचा समावेश आहे.