कराड | विद्यार्थी व पालक या दोघांना आजच्या काळात गुरुकुल पद्धत आणि शिक्षणाचे महत्व सांगणे गरजेचे आहे. नॅशनल सायन्स गुरुकुल म्हणजे आदर्श व्यक्ती आणि समाज घडवणारी जागा असल्याचे प्रसिद्ध ग्रामीण कथाकार जयवंत आवटे यांनी सांगितले.
जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तांबवे संचालित नॅशनल सायन्स गुरुकुल तर्फे 30 दिवसांचा घेण्यात आलेल्या निवासी NSG पॅटर्नचा समारोह सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच याप्रसंगी स्वप्नजा शरद नाईगडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमित पाटील, कृष्णकमल ज्वेलर्स कराडचे चेअरमन बाबुराव पवार, राष्ट्रवादी अोबासी सेलचे अध्यक्ष मोहम्मद आवटे, सुपनेचे सरपंच अशोक झिंब्रे हे प्रमुख उपस्थित होते.
NSG पॅटर्नचे संस्थापक अध्यक्ष शंभूराज पाटील यांनी शाळेचे व्यवसायिकरण युवा पिढीसाठी धोकादायक असल्याचे सांगून पिढीजात शिक्षण पद्धत बदलण्यासाठी गुरुकुल स्थापना केल्याचे सांगितले. पॅटर्न मधील सहभागी सर्व विद्यार्थी आणि सहकारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यामधे क्रीडाविभाग प्रमुख तेजस लादे आणि सहकारी तृप्ती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापन ओमकार पाटील यांनी केले. विशेष सहकार्य अनिशा बाबर आणि रोहन पावसकर यांनी केले. सदर कार्यक्रमास समस्त विद्यार्थी, पालकवर्ग आणि तांबवे पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.