व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दिशा सालियन हत्या प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग, सीबीआयला पेनड्राइव्ह देणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची मॅनेजर दिशा सालीयन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा पुनरुच्चार भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग असून माझ्याकडे पुरावे आहेत असेही त्यांनी म्हंटल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडाली आहे.

नितेश राणे यांनी थेट विधानसभा सभागृहात याबाबत थेट आरोप केले. दिशा सालियानची खरंच आत्महत्या असेल, तर तिच्या राहत्या इमारतीतलं सीसीटीव्ही फूटेज का गायब केलं गेलं? वॉचमनला का गायब केलं गेलं? तिथल्या विझिटर्स बुकमधली ८ आणि ९ तारखेचीच पानं गायब आहेत. तिचा होणारा नवरा रोहन राय देखील गायब आहे. तो कुणाच्याही संपर्कात नाही. तो साक्षीदार आहे त्या घटनेचा. मी जबाबदारीने सांगतो की ती आत्महत्या नसून हत्या आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग असून माझ्याकडे पुरावे आहेत असे नितेश राणे यांनी सांगितले. माझ्याकडे 1 पेनड्राइव्ह आहे ज्यात एक साक्षीदार मला आणि अमित साटम यांना सांगतोय की यामध्ये राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग आहे. पण मी हा पेनड्राइव्ह पोलिसांना देणार नाही तर थेट सीबीआय ला देणार आहे कारण मुंबई पोलिसांच्या तपासावरच आम्हाला प्रश्न आहे अस नितेश राणे यांनी सांगितले.