Wednesday, March 29, 2023

अरे बापरे !!! दरवर्षी नवीन बायको करणारा हा रंगेल राजा पाहिलात का ??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूर्वीच्या काळी राजे अनेक बायका करत असलेले आपण ऐकलं असेल. पण सध्याच्या काळात याची शक्यता थोडी कमीच आहे. पण आफ्रिकी देश स्वाझीलंडचा राजा मेस्वती तीन हा असा राणीवसा बाळगून असलेला श्रीमंत राजा आहे. आत्ताच त्याला १५ बायका आहेत आणि तरीही परंपरा म्हणून तो दरवर्षी नवी बायको निवडतो. या राजाची ऐयाशी राहणी, थाटमाट बघून लोकांचे डोळे फाटायची वेळ येते असेही सांगितले जाते.

नुकतीच या राजाची तब्येत करोना मुळे खराब झाल्याचे बातमी आली होती मात्र राजा एकदम ठणठणीत असल्याची घोषणा लगेच केली गेली. गेल्या काही काळात त्याने आपल्या बायकांसाठी ११९ कोटींच्या अलिशान कार्स खरेदी केल्या आहेत. शिवाय तो वेळोवेळी बायकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना महागड्या गिफ्ट देतो.

- Advertisement -

२०१८ च्या एका रिपोर्टनुसार त्याच्या एका बायकोच्या मृत्यू झाला आहे. या देशात एक विचित्र परंपरा आहे. त्यानुसार दरवर्षी राजा नवीन बायको करतो. त्यासाठी राजधानीतून तरुण मुलींची परेड काढली जाते. या तरुणींना टॉपलेस होऊन परेड मध्ये सामील व्हावे लागते. जी तरुणी त्याला नकार देईल तिला कठोर शासन केले जाते. राजा यातून एक मुलगी पसंत करतो आणि तिला आपली राणी बनवितो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’