मेहरबानांना उपरती सुचली : रूसणे- फुगणे बंद करून शहरात असलेल्या ज्वलंत मुद्यांवर एकत्र येण्याची भाषा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर आलेली आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षात सत्ताधारी, विरोधक आणि नगराध्याक्षा यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाजलेले शहराने पहायले आहे. आता शेवटचे काही पाच- सहा महिने पदाची राहिलेली आहेत, तेव्हा आता रूसणे- फुगणे बंद करावे व शहरातील ज्वलंत मुद्दे अजूनही राहिले असल्याने एकत्र येवून निर्णय घेवू अशी मागणी ऑनलाईन सभेच्या शेवटी मेहरबानांनी केली. अखेर शेवटच्या काही दिवसांत मेहरबानांना उपरती सुचल्याचा टोला एका नगरसेवकांने लगावला.

कराड नगरपालिकेची ऑनलाईन सभा झाली. या सभेत सर्वच्या सर्व 10 विषय एकमताने मंजूर केले. या सभेत नेहमीप्रमाणे वाद होणार असे अनेकांना वाटत होते. मात्र असा काही प्रकार घडला नाही. उलट आपण ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन सभा घेवून शहराच्या भल्यासाठी चर्चेतून निर्णय घेवू. येत्या काही दिवसांत आपल्या पदाची मुदत संपणार आहे, तेव्हा शहराच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र सभागृहात येवूया अशी मागणी नगरसेवकांनी केली.

ऑनलाईन सभेत सर्वच नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. कदाचित ही ऑनलाईन सभा असल्यानेच शांततेत पार पडली, अन्यथा सभागृहातील दंगा पहायला मिळाला असता. परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे मुद्दे घेवून आपल्या वार्डात जाता यावे, यासाठी आता हमरीतुमरीच्या भाषा विकासकामाकडे गेल्याचे पहायला मिळाले.

मॅडम बोलायला लागल्यावर नगराध्यांचा गैरसमज होतो – हणमंतराव पवार

नगरपरिषदेची सभा ही ऑनलाईन सुरू असताना नगरसेवकांनी ऑफलाईन घेण्याची मागणी केली. यावेळी स्मिता हुलवान म्हणाल्या, सभागृहात मुद्दे व्यवस्थित मांडता येतात. तसेच प्रत्येक विषयावर सखोल चर्चा होते. तेव्हा बांधकाम सभापती हणमंतराव पवार म्हणाले, मॅडम तुम्ही बोलायला लागल्यावर नगराध्यांचा गैरसमज होतो. या वाक्यावर ऑनलाईन सभेत मोठे हास्य झालेले पहायला मिळाले.

Leave a Comment