दरमहा 42 रुपये जमा करून मिळवा 1,000 रुपये पेन्शन, सरकारच्या ‘या’ योजनेविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेन्शनमुळे लोकांना मासिक उत्पन्न मिळते. सध्या सरकार अनेक पेन्शन योजना चालवत आहे. या योजनांमध्ये समाविष्ट असलेली अटल पेन्शन योजना (APY) तरुण आणि महिलांना खूप आवडली आहे. संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022 मध्ये असे दिसून आले आहे की, सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेत सामील झालेली 43 टक्के लोकं 18 ते 25 वर्षे या वयोगटातील आहेत. मार्च 2016 मध्ये अटल पेन्शन योजनेतील या वयोगटाचा वाटा 29 टक्के होता.

अटल पेन्शन योजना (APY) देखील अनेक महिलांना आकर्षित करत आहे. मार्च 2016 मध्ये जिथे महिलांचा सहभाग 37 टक्के होता, तो सप्टेंबर 2021 पर्यंत 44 टक्के झाला आहे. या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जास्त लोकं मासिक 1,000 रुपये पेन्शन स्वीकारत आहेत. मार्च 2016 मध्ये, 38 टक्के लोकांनी 1,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय निवडला तर सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 78 टक्क्यांवर पोहोचला. 2,000, 3,000 आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय या योजनेत समाविष्ट असलेल्या एकूण लोकांपैकी 8 टक्के लोकांनी निवडला आहे. 14% लोकांनी 5,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय पसंत केला आहे.

अटल पेन्शन योजना म्हणजे काय ?
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकते. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये जमा केल्यास, वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 1,000 रुपये पेन्शन मिळेल. त्याच वेळी, वयाच्या 18 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये पेन्शन जमा केल्यावर, निवृत्तीनंतर 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. मात्र, वयानुसार प्रीमियमची रक्कम देखील वाढते. वयाच्या 40 व्या वर्षी जर एखाद्याला अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला दरमहा 1 हजार रुपये पेन्शनसाठी 291 रुपये दरमहा जमा करावे लागतील तर 5 हजार रुपये दरमहा पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील.

अटल पेन्शन योजनेचे फायदे
अटल पेन्शन योजनेच्या प्रीमियमवर आयकर कलम 80CCD अंतर्गत टॅक्स बेनिफिट ही उपलब्ध आहे. कलम 80CCD अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. यामध्ये 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचाही समावेश आहे.

3 कोटी 90 लाख लोकं सामील झाले
12 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 कोटी 90 लाख लोकं अटल पेन्शन योजनेत सामील झाले होते. या योजनेत लोकांचे योगदान 16109 कोटी रुपये आहे. अटल पेन्शन योजना जवळपास प्रत्येक बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नवीन पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांच्या संख्येत 23.7% वाढ झाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, 37.4 मिलियन लोकं त्याच्याशी जोडले गेले होते, जे 2021 मध्ये वाढून 46.3 मिलियन झाले. NPS अंतर्गत एकूण योगदान देखील एका वर्षात 29 टक्क्यांनी वाढले आहे.

Leave a Comment