हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर येथील संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समन्वयक यांना चर्चेसाठी बोलावले आहे. ही बैठक संपल्यानंतर मंत्री अशोक चव्हाण , एकनाथ शिंदे आणि मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली आहे .
याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ही बैठक सुमारे अडीच तास चालली सरकार रिव्यू पिटीशन दाखल करणार मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाली आहे. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरु आहे.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
संभाजी राजेंच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे
— बैठकीत सहा मागण्या समोर ठेवल्या होत्या
— रिव्ह्यू पिटीशन येत्या गुरुवारी दाखल करण्यात येणार आहे.
— सारथी च्या माध्यमातून समाजाला स्वतःच्या पायावर उभा करू शकतो. याबाबत येत्या शनिवारी बैठक बोलावण्यात आली आहे. जेवढी सारथी मागणी करेल तेवढे पैसे देण्यात येतील हा शब्द आहे. असं अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
–प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह होणं गरजेच आहे. अशी मागणी करण्यात आली होती. राज्यातील 36 पैकी 23 जिल्हे निवडून वसतिगृह देण्याचे सरकारने मान्य केले आहे.
–सरकारी नोकरीच्या नियुक्त्या बाबत मागणी करण्यात अली होती. याबाबत 14 दिवसाची मुदत सरकार कडून मागण्यात आली आहे.
–कोपर्डी प्रकरणी 6 महिन्याच्या आत स्पेशल बेंच कडून सुनावणीची मागणी करण्यात आली होती. त्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
–एक समितीची स्थपणा करण्यात येणार आहे. ती सर्व मागण्यांबाबत वेळोवेळी वरील 7 बाबींचे लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी कार्य करीत राहील
–आंदोलन मागे नाहीच,21 तारखेला नाशिकला मूक आंदोलन होईल तिथेच पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षण बाबत मागण्या
1)मराठा आरक्षणामुळे 2014 ते 5 मे 2019 पर्यंत च्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात.
2)ओबीसी च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.
3)सारथी संस्थेची कार्यालया प्रत्येक महसूल विभागात सुरू करावी त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरू करून त्या ठिकाणी शिक्षण संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करून तारादूत प्रकल्प तात्काळ सुरु करा वा संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावे.
4) अण्णासाहेब पाटील महामंडळ ला दोन हजार कोटींचा निधी द्यावा लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची दहा लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रुपये करावी.
5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.