Friday, January 27, 2023

छ. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्या कमराबंद भेटीने राजकीय चर्चांना उधाण

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात कमराबंद चर्चा झाली. दोघांच्यातील चर्चेने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तोंडावर येवून ठेपलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भेट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र या भेटीने राजकीय तर्कवितर्क काढले जावू लागले आहेत.

- Advertisement -

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात रामराजे नाईक निंबाळकर व छ. उदयनराजे भोसले यांच्यात भेट झाली. शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडताना दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्यभाव होते. गाडीत बसतानाही दोघांच्यात चर्चा झाली. मात्र याबाबत कोणताही तपशील समजू शकला नसला, तरी सातारा जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठी रामराजे नाईक- निंबाळकर यांचे प्रयत्न सुरू असल्याने या विषयावरच चर्चा झाल्याचे समजत आहे.

रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, छ. उदयनराजे भोसले व आमच्या घराचे 9 पिढ्याचे संबध आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांची भेट घेतली. ते संबध जपायचा प्रयत्न करत आहे. यामध्ये दुसरे काही नाही. जिल्हा बॅंकेचे इलेक्शन लागलेच नाही, बोलायचं काय. मी सर्वपक्षीय असल्याने राजकीय बोलू शकत नाही.