सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सावकारकीपोटी लहान मुलीस ओलीस ठेवणाऱ्या सातारा येथील तीनजणांच्या टोळीला जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. टोळीप्रमुख संजय बबन बाबर (वय- 51), टोळी सदस्य अश्विनी संजय बाबर (वय- 28, दोन्ही रा.आमनेकाडा, सदरबझार, सातारा) व संकेत दिनेश राजे (वय- 31, रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबझार, सातारा) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
सातारा शहर परिसरामध्ये सावकारी करणाऱ या या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर केला होता. या टोळीकिरुद्ध दाखल असलेल्या सावकारीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करून ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी सावकारकीपोटी लहान मुलीस ओलीस ठेवल्याने त्यांना कायद्याचा कोणताच धाक राहिला नसल्याने त्यांचा जनतेस उपद्रव होऊ लागल्याचे प्रस्तावात नोंदवले होते.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी या टोळीवरील गुन्ह्यांची माहिती घेऊन तसेच त्यांचा जनसामान्यांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांच्या हद्दपारीचा आदेश पारित केला. नोक्हेंबर 2022 पासून 3 उपद्रवी टोळय़ांमधील नऊजणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच, भविष्यातही सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची तसेच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, समीर शेख यांनी म्हटले आहे.