Saturday, March 25, 2023

हाँगकाँगमध्ये विकले गेले आशियातील सर्वात महागडे अपार्टमेंट, याची किंमत किती आहे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । हाँगकाँगमधील एक अपार्टमेंट 430 कोटींमध्ये विकले गेले आहे. यामुळे हे आशियातील सर्वात महागडे अपार्टमेंट बनले आहे. हाँगकाँगचा टायकून व्हिक्टर लीच्या सीके एसेट होल्डिंग्ज लिमिटेडने 21 बोराट रोड प्रकल्पात हे अपार्टमेंट विकले आहे. खरेदीकरणाऱ्याची ओळख अद्याप जाहीर केली गेलेली नाही.

हाँगकाँग आपल्या महागड्या अपार्टमेंटसाठी लोकप्रिय आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या काळातही एका व्यावसायिकाने आशियातील सर्वात महागड्या अपार्टमेंटसाठी डील केली आहे. व्हिक्टर लीने 430 कोटी रुपयांना अपार्टमेंट विकले जाणे हे मोठे यश असल्याचे म्हंटले आहे. 5 बेडरूम्सच्या या अपार्टमेंटमध्ये स्विमिंग पूल, प्रायव्हेट रूफ आणि 3 पार्किंग स्पेसची सुविधा आहे.

- Advertisement -

3 हजार चौरस फूटांपेक्षा जास्त एरिया
21 बोरेट रोड प्रकल्पातील पाच बेडरूम्सचा हा अपार्टमेंट 3,378 चौरस फूट (314 चौरस मीटर) भागात पसरलेला आहे. त्याची किंमत 136000 हाँगकाँग डॉलर प्रति चौरस फूट इतकी आहे.

इतर अपार्टमेंटची विक्री देखील वाढेल
या अपार्टमेंटमध्ये प्रायव्हेट रूफ, तीन पार्किंग स्पेस आणि एक स्विमिंग पूल आहे. मात्र, त्याच्या खरेदीदारा विषयी कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. परंतु जगातील सर्वात मौल्यवान लक्झरी निवासी बाजारपेठांमधील एक अशा या अपार्टमेंटची विक्री हे दर्शविते की, गृहनिर्माण क्षेत्रातील सुधारणेमुळे हाँगकाँगमध्ये अशा अपार्टमेंटची मागणी वाढली आहे. तसेच यामुळे या प्रकल्पाच्या इतर अपार्टमेंटच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.