मुलाच्या आत्महत्येनंतर २४ तासात आईनेही सोडला प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | वडील रागावले म्हणून गळफास घेऊन जीवन संपणाऱ्या जिम ट्रेनर तरुण मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासात त्याच्या आईचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. मुलाने गळफास घेतल्यानंतर त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या शुश्रूषेसाठी रुग्णालयात थांबून असलेल्या आईला कोरोनाने गाठले.

किरण कचरू ठाकरे (२१) आणि भारती कचरू ठाकरे (४५ दोघे रा. पुंडलिकनगर) अशी या मृत मुलगा व आईचे नाव आहेत.
किरण हा छत्रपती कॉलेजमध्ये बी ए अंतिम वर्षात शिकत होता. शिवाय तो जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. आई-वडील आणि बहिणीसह तो राहत होता. किरणचे वडील अडीच वर्षापासून पक्षाघातामुळे अंथरुणावर पडून आहेत. पेन्शनवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. ८ मे रोजी रात्री ८:३० वाजता किरणला घरगुती कारणावरून त्याचे वडील रागावले म्हणून तो रागाच्या भरात किचन मधून पाण्याची बॉटल घेऊन बेडरूम मध्ये गेला. व त्याने खोलीचे दार आतून लावून घेतले आणि पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. आवाज देऊनही किरणे दार न उघडल्यामुळे शेवटी दार तोडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याच्या आई आणि बहिणीने त्याला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी किरणच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. तेथे उपचार सुरू असताना किरण १३ मे रोजी रात्री मरण पावला.
या घटनेची पुंडलिक नगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली हवलदार जगदीश चव्हाण पुढील तपास करत आहेत.


व्हेंटिलेटर न मिळाल्याने झाला आईचा मृत्यू

किरणच्या तब्येतीबद्दल माहिती मिळताच किरणच्या आईने धसका घेतला. किरणच्या आईने अन्नपाणी सोडून दिले. दवाखान्यात असताना त्यांची कोविडची चाचणी केल्यानंतर त्यात त्या पॉझिटिव्ह आढळल्याने घाटीच्या कोविड वॉर्डांत त्यांना दाखल करण्यात आले. किरणच्या जाण्यामुळे त्यांचे दुःख अनावर झाले. त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेच्यावेळी औषधे घेत नसल्यामुळे त्यांची परिणामी ऑक्सिजन पातळी घसरत गेली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती मात्र घाटीमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने १४ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment