हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा वस्तूस्थिती सांगावी. आणि “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. वास्तविक करमुक्तीचा निर्णय हा केंद्र सरकारने घ्यावा जेणे करून जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्वांना पाहता येईल, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.
“महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो आणि शिवसेना काँग्रेसला कमी निधी दिला जातो, असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु, हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही,”
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/671584270653528
यावेळी अजित पवार यांनी अधिवेशनात “द काश्मीर फाईल” या चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला. हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने कर मुक्त करावा अशी मागणी केली जात आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारच्या चित्रपटांच्या कर मुक्तीच्या बाबतीत निर्णय घ्यावेत. महाराष्ट्राला निर्णय घेण्यास लावून दुजाभाव कशाला निर्माण करायचा? असे पवार यांनी म्हण्टल्यानंतर सभागृहात विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली.