Friday, June 2, 2023

‘त्या’ तिहेरी आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम, मुलीच्या कुटुंबाकडे सापडली चिठ्ठी

सांगली । तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम आहे. सदरची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा आहे.

मात्र, मयत शिवानी चंद्रकांत घाडगे या हातीद येथील मुलीच्या घरी चिठ्ठी सापडली आहे. तपासाच्या दृष्टीने त्यातील मजकूर शकला नाही. मात्र शिवानी ही गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत हातीद येथे तिच्या घरी असल्याचे समजते. तर पहाटे सहा वाजता ती मणेराजुरी येथील डोंगरावर मयत आढळली.

शिवानी तीन तासात हातीद मधून कशी आली, तिला कुणी आणले, हे सर्व प्रश्न अनुत्तरित असून या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच याचा उलगडा लवकरच होईल असे तासगाव पोलिसांनी आहे.