मुंबई प्रतिनिधी | सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाने केली होती. या मागणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवी यांच्या माहेरील वंशज आणि राज्यातील मृदा आणि जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूरला जाऊन विद्यापीठाचे नामकरण कारणात आहेत, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणा संदर्भात घोषणा केली होती. ३१ मी २०१८ रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नामकरण होणार होते. मात्र विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे मागणी धनगर समाजाने केली होती तर, सिद्धेश्वराचे नाव देण्याची लिंगायत समाजाची मागणी होती . त्यामुळे अनेक वर्षांपासून हा वाद चालू होता.
धनगर समाजाच्या मागण्यां संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. धनगर समाज्याच्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
इतर महत्वाचे –
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे अनेक मित्र – नरेंद्र पाटील
दहावीचा पहिला पेपर धाकधुकीत अन् उत्साहात….!