शहरातील 43 केंद्रांवर पार पडली ‘नीट’ परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (नीट) ची परीक्षा रविवारी काल पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते तर औरंगाबादेत 43 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शहरात बुलढाणा, बीड, परभणी, जालना आदी जिल्यांतून परीक्षार्थी आले होते.

वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेसाठी शहरातून १५ हजार ८५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली. परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यंनाची टक्केवारी ९७.०५ इतकी होती. परीक्षेला येतांनाची नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना दागदागिणे, ज्वेलरी घालून येवू नये. मोबाईल अथवा मेटलची कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नव्हती तसेच दिलेल्या वेळेच्या किमान अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाणे अनिवार्य होते.

याबरोबरच परीक्षेला येताना तोंडाला मास्क, हॅण्डग्लोव्हज् घालून येणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी फूल शर्ट आणि मुलींनी अंगभर डिझायनर कपडे, मोठे बटण असलेले कपडे घालून परीक्षेला येवू नये. तसेच मोठ्या हील्सचे सॅंडल, शूज तसेच मोठे खिसे असणाऱ्या पॅन्ट घालून येवू नये. परीक्षेला येताना हाफ शर्ट, टी-शर्ट घालून येण्यास परवानगी दिली होती. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी शूज, चप्पल किंवा सॅण्डल्स वर्गाच्या बाहेर काढून ठेवावे लागले होते. सोबत सॅनिटायझर घेवून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. पेपरची वेळ तीन तासांची असली तरी त्यासाठी विद्यर्थ्यांना मात्र ५ पेक्षा जास्त तास परीक्षा केंद्रांवर घालवावे लागले.

Leave a Comment