राज्यात कोरोना मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज- मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातील कोव्हीड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-पद्धतीने उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड आदी उपस्थित होते.

आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहोचली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारणार आहोत, असेल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, महसुल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून या सर्वांचे कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

याशिवाय खरोखरच जालना शहरात आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

the-need- for-a-comprehensive-collective-effort-to-reduce-corona-mortality-in-the-state

Leave a Comment