पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच : धनंजय मुंडेचे वक्तव्य तर सुप्रियाताईंचे नवस

Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचे नवस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी पक्षाचा व्हावा, यासाठी सुप्रिया सुळे यांनी मंदिरात जावून नवस केला. तर साताऱ्यात जाहीर सभेत धनंजय मुंडे दाैऱ्यावर असताना वक्तव्य केले. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून राजकीय चर्चांनी वेग घेतला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री आहे. तेव्हा आता पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार या वक्तव्याचा गेल्या काही दिवसांपासून वारंवार उल्लेख केला जात आहे. त्यावर महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 2024 पर्यंत उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. विधानसभा निवडणुकीनंतर काय चित्र असेल त्याप्रमाणे त्यावेळी निर्णय घेतला जाईल.

काही लोकांना दिवसा स्वप्न पडतात : नाना पटोले

काॅंग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार टोला लगावला आहे. काही लोकांना दिवसा स्वप्न पडतात, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची इच्छा असते, असेही म्हणाले.