मोदींनी भेट दिलेला निमूचा प्रदेश आहे उंचावरील सर्वात खडतर प्रदेश  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल झाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना कोणतीच पूर्वकल्पना न देता ते असे अचानक आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये पँगाँग टीएसओसह गलवान खोऱ्यावर दावा सांगणाऱ्या चीनसाठी सुद्धा हा एक सूचक इशारा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे.

लेहमध्ये मोदींनी निमू येथील पोस्टला भेट दिली. निमू हे समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहे. युद्धाच्या दृष्टीने विचार केल्यास हा अत्यंत खडतर, कठीण असा प्रदेश आहे. इथे ड्युटीवर तैनात असलेल्या सैनिकांना सुद्धा वेगवेगळया आव्हानांचा सामना करावा लागतो. या परिसराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. निमूचा भाग हा सिंधु नदीच्या किनाऱ्यावर आहे. हा सर्व परिसर जंस्कारच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. निमूमध्येच सिंधु आणि जंस्कार नदीचा संगम होतो. इथून सिंधु नदी पुढे उत्तर पश्चिमेला असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने वाहत जाते.

निमूच्याच भागामध्ये आलची गावामध्ये निमू-बाजगो हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्प उभारण्यात आलाय. भारताच्या या प्रकल्पाला पाकिस्तानने विरोध केला होता. लेहहून कारगिलच्या दिशेने जाताना मध्ये निमूचा प्रदेश लागतो. अक्साई चीन आणि पीओकेच्या दृष्टीने निमू सामरिकदृष्टया भारतासाठी खूप महत्वाचे आहे. हा खूप दुर्गम भाग आहे. या भागात मोदींनी आज भेट दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment