देशातील कोरोनारुग्णांची संख्या ५ हजार पार, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे ४७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२७४ रुग्णांची पुष्टी झाल्याची नोंद आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ४१० लोक बरे अथवा घरी सोडण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे.

उत्तर प्रदेशमधील वाढत्या कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकार राज्यातील १५ जिल्ह्यांना सील करणार आहे. या कालावधीत या जिल्ह्यांमध्ये केवळ होम डिलिव्हरी आणि वैद्यकीय पथकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्य सचिव आर के तिवारी म्हणाले, उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव खूप जास्त आहे, त्यामुळे या बाधित भागाला सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेथे फक्त १००% होम डिलिव्हरी दिली जाईल आणि फक्त आरोग्य विभाग आणि होम डिलिव्हरी व्यतिरिक्त कोणीही तिथे जाणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment