देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ झाली आहे.यापैकी ११ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशात मात्र ही आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत येथे ७२२ लोकांना व्हायरसने ग्रासले असल्याचे समजते. त्यापैकी ९२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे.

अरुणाचल प्रदेशात फक्त १ कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे मात्र आसाममध्ये हा आकडा ३५ झाला आहे, येथे १९ लोकांना घरी सोडण्यात आले आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.बिहारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार मंगळवार सकाळपर्यंत ११३ लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.त्यापैकी आतापर्यंत ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २ जण मरण पावले आहेत.चंदीगडमध्ये ही संख्या २६ झालेली आहे. छत्तीसगडमध्ये ३६ लोक या विषाणूमुळे पीडित असल्याचे सांगितले जात आहे तर येथे २५जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोनाग्रस्त लोकांची संख्या अजूनही वाढतच आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,२०८१ लोक या विषाणूमुळे पीडित आहेत तर ४३१ जणांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे.एकट्या दिल्लीत सुमारे ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे, गोवा हे कोरोना मुक्त राज्य ठरले आहे. येथे ७ संसर्गित होते त्या सर्वांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Coronavirus outbreak causes supply problem for India's drugmakers ...

गुजरातमध्येही करोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढली आहे.येथे १९३९ लोक या विषाणूमुळे पीडित असल्याची माहिती मिळाली आहे तर १३२ लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे आणि ७१ लोक मरण पावले आहेत. हरियाणामध्ये ही संख्या २५४ वर पोहोचली आहे.येथे १२७ लोकांना सोडण्यात आले आहे.तर केवळ ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये ही आकडेवारी ३९ पर्यंत कमी झाली आहे तर १६ जणांना घरी सोडण्यात आले आहे आणि एकाचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्येही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या वाढून ८८८ इतकी झाली आहे आणि ७१जणांना घरी सोडण्यात आले आहे तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.झारखंडमध्ये ही संख्या ४६ झाली आहे तर येथे २ लोक मरण पावले आहेत.कर्नाटकात ही संख्या ४०८ वर पोहोचली आहे.तर १२२ लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या राज्यात कोरोनामधील मृतांचा आकडा हा १६ झालेला आहे.

केरळमधील कोरोनामुळे त्रस्त लोकांची संख्या ४०८ वर पोहोचली आहे.तर २९१ लोकांना येथे घरी सोडण्यात आले आहेतसेच ३ जण मरण पावले आहेत. लडाखमध्ये या संसर्गाची केवळ १८ प्रकरणे घडली आहेत तसेच १४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.

Coronavirus Highlights: COVID-19 claims 124 lives; infects 4,789 ...

मध्य प्रदेशात या विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवार सकाळपर्यंत १४८५ लोकांना व्हायरसने ग्रासले असल्याचे समजते तसेच १२७ लोकांना घरी सोडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, मणिपूरमध्ये ११, मेघालयात ११, मिझोरम आणि नागालँडमध्ये एकाही घटनेची नोंद झालेली नाही. ओरिसामधील ७४ लोक या विषाणूमुळे पीडित आहेत तर २४ जणांना सोडण्यात आले आहेत तसेच एकाचा मृत्यू झालेला आहे. पुडुचेरीमध्ये केवळ ७ प्रकरणे नोंदली गेली आहेत.येथे ३ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

पंजाबमध्ये हा आकडा २४५ वर पोहोचला आहे तर ३८ लोकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तसेच १६ लोक मरण पावले आहेत.कोरोनाचा कहर राजस्थानमध्येही स्पष्टपणे दिसतो आहे. येथे १५७६ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि २०५ लोकांना येथे घरी सोडण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाने १५२० चा आकडा गाठला आहे तर ४५७ जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तसेच १७ लोक मरण पावले आहेत.

Coronavirus LIVE: 80% Covid-19 cases asymptomatic in India; tally ...

तेलंगणात कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या ८७३वर पोहोचली आहे तसेच ४५७ लोकांना सोडण्यात आले आहेत, तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत त्रिपुरामध्ये केवळ दोन प्रकरणे समोर आली आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत उत्तराखंडमध्ये ४६ प्रकरणे नोंदली गेली आहेत तसेच १८ जणांना सोडण्यात आले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये ११८४ लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहेतर १४० लोकांना सोडण्यात आले आहेत तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये हा आकडा ३९२पर्यंत पोहोचला आहे तसच ७३ लोकांना घरी सोडण्यात आले आहे तर १२ लोक मरण पावले आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment