‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येसह मृत्यू संखेतही झाली वाढ, कोरोनाचे नवे 870 रुग्ण तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होत असताना सहाव्या दिवशीही रुग्णवाढ कायम राहिली. जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 290 रुग्णांचा समावेश आहे. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा पार केला. बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी 33 कडेगाव 12, खानापूर 51, पलूस 61, तासगाव 81, जत 57, कवठेमहांकाळ 41, मिरज 92, शिराळा 46 आणि वाळवा तालुक्यात 106 रुग्ण आढळले.

मगील चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असताना मृत्यूमध्येही वाढ झाली. चोवीस तासात कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1280 पैकी 355 बाधित तर 2042 अँन्टीजेन चाचणीमध्ये 546 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या 5 हजार 62 वर पोहोचली. याशिवाय बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 लाख 6 हजार 256 हजार रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 5 हजार 414 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 95 हजार 780 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 62 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यापैकी 4894 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 165 रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु असून 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment