कचऱ्यामुळे या गावात वाढतेय ‘लग्नाळुंची’ संख्या …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Reporter । देशात स्वच्छतेचा नारा जरी दिला जात असला तरी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या आसपासच्या अनेक गावात कच-याचा महापूर आला आहे. एकीकडे कचर्‍याने आजार वाढत असताना , दुसरीकडे लग्नाळुंची संख्या वाढत आहे.आता तुम्ही म्हणाल कि कचरा आणि लग्नाळुनच कायसंबंध तर , अत्यंत घनिष्ट संबंध आहे . ते कसे पाहुयात ,

कानपूरच्या पनकी पाडवा, जमुई, बडुआपुर सरैमिता गावात इतकी घाण आहे की , लोकांना या मुलांसह त्यांच्या मुलींचे लग्न या खेड्यांतील मुलां-मुलींबरोबर नको आहे. या गावात कानपूर महानगरपालिकेचा घनकचरा येथून जवळच आहे, त्यामुळे गावात घाण आणि रोग पसरतात. यामुळे या खेड्यांमध्ये कोणालाही सोयरीक करायची नाहीये .

या गावातील 70 टक्के लोकांना टीबी आणि दम्याचा त्रास आहे. आजारपणामुळे येथे जवळपास पाच वर्षे लग्न होत नाही. या कारणास्तव तरूणांचे स्थलांतर होते. लग्न झालंच तरीही ते मोडतो.

या कचऱ्याला आता दुसर्‍या ठिकाणी हलविण्याची तयारी करत आहे. याचे काम प्रगतीपथावर आहे. रोगांचा सामना करण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातात. कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी या प्रकरणी ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे . हा कचरा अनेक वर्षांपासून तेथे टाकला जात आहे. याचा अंत करण्यासाठी योजना आखली जात आहे. यासाठी लवकरच काहीतरी केले जाईल.असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment