पोलीस असल्याचे सांगून वृद्धेला लुटले, 3 लाख 50 हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पोलीस असल्याची बतावणी करीत जत शहरातील मंगळवार बाजार पेठेत राहणार्या श्रीमती सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल यांच्या अंगावरील साडेसहा तोळ्याचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. या दिवसा ढवळ्या चोरीत तिघा अज्ञात चोरट्यांनी अत्यंत विश्वासाने या वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

सूरजदेवी ओसवाल या मंगळवार बाजारपेठेतील आपल्या राहत्या घरातून गांधी चौकात असलेल्या मारुतीचे दर्शन आणि त्यानंतर शिवानुभव मंडप शेजारी असलेल्या जैनवस्ती देवदर्शन असा त्यांचा नित्य कार्यक्रम आहे. नेहमीप्रमाणे श्रीमती ओसवाल गांधी चौकातील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्या शिवानुभव मंडप शेजारी असलेल्या जैन मंदिरात दर्शनासाठी जात असताना इराणा जेऊर यांच्या घराशेजारी श्रीमती ओसवाल यांना अज्ञात तिघांनी तरुणांनी अडवले

आपण पोलीस असल्याचा बहाणा करीत कालपरवा सोने चोरीस गेले आहे अशी पध्दतशीरपणे बतावणी करीत श्रीमती ओसवाल यांना बाजूला घेऊन हातातील साडेसहा तोळ्याच्या बांगड्या काढून देण्यास सांगितले. ओसवाल यांना समजण्याच्या आत हातातून बांगड्या काढून घेतल्या आणि गळ्यातील चेन सुद्धा मागून घेतली आणि चाकू दाखवून या अज्ञात तिघांनी तेथून सोने घेऊन पोबारा केला.

Leave a Comment