मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला ऑक्सीजन प्लांट दोन आठवड्यातच बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट चे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने दोन आठवड्यातच हा प्लांट बंद पडला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्लांट औरंगाबाद शहरासाठी दिला होता.

मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आणि महापालिकेच्या मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांटची गरज होती. यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली होती.

दीपक फर्टिलायझर कंपनीला ‘सीएसआर’ मधून मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचे आदेश दिले कंपनीने तातडीने प्लांट बसवुन दिला. परंतु सध्या हा प्लांट तांत्रिक कारणामुळे बंद असून ऑक्सिजनची क्वालिटी तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. आता पुढील अहवाल येईपर्यंत हा प्लांट बंदच असणार आहे.

Leave a Comment