Sunday, February 5, 2023

बिडकीन मध्ये चड्डी- बनियान गॅंगची दहशत; तीन घरे फोडण्याचा प्रयत्न दुचाकी लंपास

- Advertisement -

औरंगाबाद : बिडकीन गावात शनिवारी मध्यरात्री चड्डी-बनियान गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला.गावातील तीन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला व दुचाकी लंपास केली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने चोरटे पळाले.या प्रकरणी गावकऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिडकीन गावात चड्डी- बनियान घातलेले 6 ते 8 चोरटे दाखल झाले होते.

चोरट्यानी अहेमद पटेल यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र दार न तुटल्याने त्यांनी आजूबाजूचे इतर घर फोडण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर त्यांनी गावातीलच ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत कर्मचारी विलास सोकटकर यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

दरम्यान, बाहेर उभे रेकी करणाऱ्या चोरट्यांची हालचाल संशयित वाटल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यानी सोकटकर यांची दुचाकी घेऊन पळ काढला.ही बाब समजताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत.चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. या प्रकरणी दुपार पर्यन्त पोलीस प्रक्रिया सुरू होती.