दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. कधी आत्महत्या, कधी हत्या तर कधी ड्रग्स असे विविध मुद्दे उचलून त्यावर अनेक हॅशटॅगही ट्रेंड झाले. सुशांत सिंग राजपूत केसबाबत सध्या अनेक विविध खुलासे होताना दिसत आहेत. NCB च्या कारवाईचा वेग पाहता लवकरच या प्रकरणाचा छडा लागू शकतो. या दरम्यान अनेक निर्माते सुशांतच्या जीवनाचे भाष्य करणारा एखादा जीवनपट अर्थात चित्रपट तयार करावा असा मानस ठेवताना दिसत आहेत. अनेकांनी याबाबत चर्चाही केल्या होत्या. यास विरोध दर्शवित सुशांतच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हि याचिका मात्र दिल्ली न्यायालयाने फेटाळल्याची माहिती मिळत आहे.

एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आयुष्याबाबत प्रस्तावित चित्रपट निर्माण करण्याविरोधात सुशांतसिंगच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सुशांतच्या वडिलांनी कोणालाही आपल्या मुलाचे नाव किंवा चित्रपटात त्याच्या व्यक्तिमत्वाशी असणारा सारखेपणा वापरण्यास सक्त मनाई करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने हि याचिका फेटाळल्यानंतर अनेक निर्माते पुन्हा एकदा सुशांतच्या जीवनाचे भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर काम करण्यास मोकळे झाले आहेत. याबाबत सुशांतच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप त्यांनी माध्यमांशी कोणताही संपर्क साधलेला नाही.

https://www.instagram.com/p/Bv3IxAgFauc/?utm_source=ig_web_copy_link

दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची केस NCBने हाताळावी अशी सुशांतच्या घरच्यांची मागणी असता हि केस NCB कडे सुपूर्त करण्यात आली. यानंतर NCB च्या अंतर्गत या केसच्या प्रकरणास चांगलाच वेग आला आहे. अलीकडेच सुशांतच्या खास आणि जवळच्या मित्रांपैकी एक तसेच त्याचा स्वीय सहाय्यक सिद्धार्थ पिठानी याला हैद्राबादमध्ये अटक करण्यात आली. यानंतर सुशांतला ड्रग्स पुरवणाऱ्या ड्रग्स पेडलरला देखील NCBने मुंबईतील बांद्रा येथे अटक केली. आता पुन्हा एकदा सुशांतच्या केस संदर्भात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरु असून या चौकशी दरम्यान अनेक विविध खुलासे होत असल्याची माहिती आहे.

Leave a Comment