श्रीनगर वृत्तसंस्था | श्रीनगरमध्ये एयरफोर्सच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यातील नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे शाहिद झाले आहे. जम्मू-काश्मीरमधी बडगाम येथे हेलिकॉप्टरचा अपधात झाला होता त्यात २ वैमानिक आणि ६ जवान शाहिद झाले आहेत.
स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे कुटुंबिय नाशिक शहरातील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन वर्षी मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटूंब आहे. निनाद त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे नोकरीनिमित्त लखनौला राहत होते. त्यांची पोस्टिंग श्रीनगर येथे होते.
निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या २६ व्या कोर्सचे विध्यार्थी होते. नंतर त्यांची निवड एनडीएत झाली आणि ते हेलिकॉप्टर पायलट झाले.
२००९ मध्ये ते एअरफोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर या पदावर रुजू झाले होते. एक महिन्यापूर्वी त्यांनी श्रीनगर येथे बदली झाली होती. त्यातच काळ हे दुःखद घटना घडली. निनादने आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नाव मोठे केले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना निनाद यांच्या वडिलांनी व्यक्त केली.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात … दोन जवान शाहिद
आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल