धक्कादायक ! गुन्हेगाराची बायको आहे म्हणून पोलिसांनी नाकारली विनयभंगाची तक्रार ; उलट केला खोटा गुन्हा दाखल, पीडितेची आयुक्ताकडे तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | शहरातील सातारा परिसर या भागातील एका महिलेची अजय शिरसाजी गायकवाड
वय (26) नामक गुंड वृत्तीचा माणूस वारंवार छेड काढत होता. त्या महिलेने सातारा परिसर हद्दीतील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र तेथील पोलिसांनी तुझा नवरा आरोपी आहे म्हणत त्या महिलेची तक्रार नोंदवली नाही असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडित महिला ही रात्री आईच्या घरून जेवण करून येत असताना घराजवळच राहणाऱ्या गुंडाने तिचा हात धरला व तू मला खूप आवडते म्हणत अंगलट येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पीडित महिलेने त्याच्यासोबत वाद घालत असल्यामुळे त्याने तिच्यासोबत मारहाण करत तिला ढकलून दिले त्यावेळी तिच्यासोबत तिचे छोटे मुलही होते. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमले असही ती महिला म्हणाली. या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही त्यामुळे ती महिला वकिलाकडे कोर्टात गेली असता तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची माहिती तिला मिळाली. हा गुन्हा खोटा असून माझ्यावर भांडण केल्याचा गुन्हा दाखल केला त्यावेळी मी कोर्टामध्ये होते आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सत्यता आढळून येईल त्यामुळे पोलिसांनी सत्य काय आहे ही पडताळणी करून माझ्यावर गुन्हा दाखल करावा असं महिला म्हणाली.

या घटनेनंतर ही आरोपी दोन-तीन वेळा महिलेच्या घरी जाऊन तिला त्रास देत होता. यामुळे महिलेने अनेक वेळा पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही असही ती म्हणाली.

पोलीस आयुक्तकडे केली न्यायाची मागणी
मी आरोपीची बायको आहे म्हणून माझी दखल पोलीसांनी घेतली नाही आरोपींची बायको असले तरीही एक महिला म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी महिलेने हॅलो महाराष्ट्रच्या माध्यमातून पोलीस आयुक्ताकडे केली आहे.

 

https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/780772282807868/

Leave a Comment