राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण – गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदभार्तील काही जिल्ह्यांसाठीही आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पुढील चार, पाच दिवस ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात अवकाळी व बेमोसमी पावसाचे प्रमाणही वाढले असल्याने व निसर्गाचे दुष्टचक्र पूर्णपणे बदलल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

आधीच देशासह राज्यावर कोरोनाचे संकट सातत्याने कायम राहात असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment