मुंबई । संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच यावर कोणतीच लस उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक औषधांचा वापर हा रुग्णांवर करण्यात येत होते. यामध्ये सुरुवातीला अनेक औषधांचा वापर करण्यात येत होता. त्यापैकी एक औषध म्हणजे फ्याबी फ्लू. हे औषध रुग्णाला गोळ्यांच्या स्वरूपात देण्यात येत आहे. सध्या कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून फ्याबी फ्लू या गोळ्या गुणकारी ठरत आहेत. त्यामुळं या फ्याबी फ्लू गोळ्यांची मागणी वाढली आहे. असं असताना गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मात्र एका महिन्यात या फ्याबी फ्लू गोळ्यांची किंमत रुग्णांसाठी 1 हजार रुपयांनी कमी केलेली आहे.
या गोळ्याचं उत्पादन ग्लेन्मार्क कंपनी करते. दरम्यान, फ्याबी फ्लू गोळ्यांचे उत्पादन करण्यासाठीचा कच्चा माल ग्लेन्मार्क कंपनीला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे कंपनीने याचा फायदा थेट रुग्णांना व्हावा यासाठी या गोळ्याची किंमत तब्बल 1 हजार रुपयांनी कमी केली आहे. याआधी 34 गोळ्यांचे फ्याबी फ्लूचे एक पाकिट 3500 रुपयाला मिळत होते. मात्र आता कंपनीने दर कमी करून फ्याबी फ्लू गोळ्यांचे पाकीट 2500 रुपयांना उपलब्ध केले आहे. पूर्वी 103 रुपयाला एक गोळी होती. आता हीच गोळी 75 रुपयाला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एका गोळी मागे 27 रुपये बचत झाली आहे.
कोरोनावर गुणकाकारक असलेली रेमंडेसिविर आणि टोसिलिझुमप औषधाचा तुटवडा असल्यामुळे पर्यायाने फ्याबी फ्लूची मागणी वाढली आहे. या गोळ्यांच्या उत्पादन आणि वापरात ४ महिन्याचे अंतर आहे, या गोळ्या 4 महिन्यात वापराव्या लागणार असल्याने याचा काळाबाजार अथवा साठा करता येणार नाही. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही ही देता येत नाहीत. या गोळ्यांच्या पाकिटात एक फॉर्म येतो. तो फॉर्म डॉक्टर आणि रुग्णाने भरून देणे बंधनकारक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”