‘टीईटी’ अर्ज भरण्यासाठी तीन ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 ऑगस्ट पासून सुरू होईल. 25 ऑगस्टपर्यंत डीटीएड, बीएड धारकांना अर्ज भरता येणार आहेत.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात परीक्षा घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019 पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नाही. कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याने परिषदेने याबाबत सरकारकडे विचारणा केली होती.

परीक्षा घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर परिषदेने वेळापत्रक जाहीर केले असून (प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1) व (माध्यमिक स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 2) परीक्षा घेतली जाते. परीक्षा संदर्भात ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती http://mahatet.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment