साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जसं सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील, तेव्हा साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट सुटल्याची खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली आहे.

शाहूपुरी पाणी योजनेच्या शुभारंभ केल्यानंतर उदयनराजेंनी वीस वर्ष सहपरिवार त्यांना पाण्यापासून 20 वर्षापासून वंचित ठेवले अशी खोचक टीका शिवेंद्रराजे यांच्यावर करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हद्दवाढीचा निर्णय यांच्यामुळेच लांबला हे सत्य आहे. ज्या मार्गाने पैसे मिळतील त्या मार्गाने खायचा असे त्यांचे काम सुरु असते. त्यामुळे नारळ फाेड्या गॅंगला सातारकर आता नारळ देतील आणि संपुर्ण सातारा विकास आघाडीला घरी बसवतील.

पुढे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जे काम मंजूर हाेते त्याचा नारळ फाेडायला ही मंडळी पुढं असतात. गत 20 वर्षात त्यांच्याकडे खासदारकी हाेती. काही काळ ते मंत्री देखील हाेते. शाहूपूरीची ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांच्याच नेतृत्वाखाली निवडून येत हाेते. खरंतर २० वर्षापासून शाहूपूरीवासियांना त्यांना जबाबदारी दिली हाेती. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून काेणी वंचित ठेवले? असा प्रश्न राजेंनी विचारला आहे.

Leave a Comment