अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी होणार खुले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे करोडो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. या करोडो भाविकांना आता राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. डिसेंबर 2023 हे राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.

सध्या आयोध्येत मोठ्या वेगाने राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले होते. या भूमिपूजनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोध्येत विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. सध्या ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रसिद्ध असलेल्या भव्य राम मंदिर 2023 पर्यंत बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे डिसेंबर 2023 पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.