औरंगाबाद | नुकतीच पावसाला सुरुवात होताच वेरूळ आणि कन्नड जवळील पूल, बायपास रस्ता खचला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी झाली वाहन काढण्यास अडथळा निर्माण झाला. तसेच औरंगाबाद ते कन्नड या मार्गावर लावण्यात आलेले फलक सदोष असून ते बदलावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वीच या बायपासवरील रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या बायपास रस्त्याला तडे पडणे, पुलाला भगदाड पडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाहणी करण्याची मागणी केली जात आहे.
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले. परंतु पहिला पाऊस झाला आणि वेरूळ जवळील पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.