धनंजय मुंडे अन करुणा यांच्यातील संबंध लग्नासारखेच; कोर्टाचा महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे अन करुणा शर्मा यांच्यातील वाद अख्या महाराष्ट्राभर पसरला आहे. या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबईतील माझगाव कोर्टाने माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अन करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील संबंध लग्नासारखेच असल्याचा निर्णय दिला आहे. कोर्टानुसार, दोन मुलांना जन्म देणं हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे करुणा शर्मा ह्या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळवायला पात्र आहेत, असंही कोर्टाने सांगितले. विशेष म्हणजे, करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांना देखील नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी, असं कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे. याचिकेची फेटाळणी करत कोर्टाने करुणा शर्मांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश –

कोर्टाने म्हटले आहे की, करुणा शर्मा अन धनंजय मुंडे यांच्यातील संबंध एका घरात राहिल्याशिवाय असू शकत नाहीत, अन त्यांना दोन मुलं आहेत, हे देखील या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. तसेच , करुणा शर्मांना अन त्यांच्या मुलांना नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी, कारण त्यांच्या जीवनाची गुणवत्ता देखील तशीच असावी. यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेल्या याचिकेवर निर्णय घेत असताना, कोर्टाने करुणा शर्मांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .

धनंजय मुंडेंचा दावा कोर्टाने केला अमान्य –

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या याचिकेत दावा केला होता की त्यांनी करुणाशी लग्न केलेले नाही, पण कोर्टाने हा दावा अमान्य केला आहे. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, करुणा शर्मा यांना घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळायला हवा , आणि त्यांच्या मुलांसह त्यांना योग्य पोटगी दिली जावी.

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेवर केले गंभीर आरोप –

करुणा शर्मांनी धनंजय मुंडे गंभीर आरोप केले आहेत. त्यात त्यांनी दावा केला आहे की, मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर देणार आहे. या आरोपासोबतच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप केला.