अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चित लांबणीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य लोकप्रिय स्टार विजय देवरकोंडाचा लवकरच नवाकोरा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचे नाव ‘लायगर’ असे आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गास रोख लावण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात कडक निर्बंधांसह कडक लोकडाऊन लावले आहे. यामुळे चित्रपटांचे चित्रीकरण थांबले असून या चित्रपटाचे संपूर्ण काम पूर्णत्वास जाईल याची शास्वती नाही. त्यामुळे चित्रपटाचे यंदाचे प्रदर्शन नक्कीच धोक्यात आहे. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच जाहीर झाला आहे. करण जोहरने या सिनेमाचे शीर्षक आणि त्याची रिलीज डेटदेखील जाहीर केली होती. हा सिनेमा यावर्षी ९ सप्टेंबर २०२१ ला रिलीज होणार होता.

https://www.instagram.com/p/CLJrrM2BAu5/?utm_source=ig_web_copy_link

लायगर या चित्रपटात मुख्य भूमिकेत अनन्य पांडे हि सुंदर अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा हा बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण करणार आहे. ‘लायगर’चे बरेच शूटिंग अजून बाकी आहे. परिणामी हा चित्रपट या वर्षी रिलीज होण्याची चिन्हे फारच कमी दिसत आहेत. यामुळे चित्रपट आता बेमुदत पुढे ढकलण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CM6jAsWhBjh/?utm_source=ig_web_copy_link

‘लायगर’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करायला स्वतः करण जोहर उत्सुक नाही. त्याबरोबर हिंदीत पदार्पण करणाऱ्या विजय देवरकोंडाच्या फिल्मी करिअरसाठीही ‘लायगर’ थिएटरमध्येच रिलीज होणेच त्याच्या फायद्याचे आहे.

https://www.instagram.com/p/CL81rxcA0Wa/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटाचे शूटिंग अगदीच अखेरच्या टप्प्यात असताना कधीही पूर्ण होईल अश्या स्वरूपात होते. मात्र असे असतानाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी निर्बंध लागू झाले. हे निर्बंध कधी उठवले जातील आणि शूटिंग पुन्हा कधी सुरू होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. या अनिश्‍चिततेमुळे ‘लायगर’ अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलणे, हा एकच पर्याय शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता ‘लायगर’ कधी रिलीज होईल हे कोणीही सांगू शकत नाही.

Leave a Comment