विद्यापीठातील काही विभागांचे निकाल अजूनही लागेना 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील हे 29 ऑक्टोबर रोजी कार्यमुक्त झाले असून डॉ. गणेश मंदा यांच्याकडे या पदाचा प्रभार देण्यात आला आहे. असे असून अजूनही 12 प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम तसेच विद्यापीठातील काही विभागांचे निकाल रखडलेले आहेत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर केले जातील असा विश्वास डॉ. मंझा यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील हे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यांच्या नियुक्तीवर काही संघटना तसेच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता. आधीसभेच्या बैठकीत यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. तथापि, या मागणी पूर्वीच त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते 29 ऑक्‍टोबर रोजी विद्यापीठातून कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांचा पदभार डॉ. गणेश मंझा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. पण त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारींची डॉ. मंझा व त्यांच्या सहकार्‍यांनी खातरजमा केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ‘पीआरएन’ क्रमांक चुकीचे नोंदवले होते. अनेक विद्यार्थ्यांनी अनावधानाने दुसऱ्या शाखेच्या द्वितीय भाषेचा पेपर सोडवला होता. त्यात दुरुस्ती केल्यानंतर आतापर्यंत 60 विद्यार्थ्यांच्या निकालात दुरुस्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभाग हे स्वायत्त असल्यामुळे तेच परीक्षा घेतात व निकालही तेच जाहीर करतात. निकालाचा ताळमेळ लावण्याचे काम परीक्षा विभाग करते व यादी त्या त्या शैक्षणिक विभागाकडे दिली जाते. विद्यापीठातील काही शैक्षणिक विभागांची ही निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.

Leave a Comment