पुणे- बंगलोर महामार्गावर झायलो गाडीच्या धडकेत रिक्षा चार वेळा पलटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगलोर महामार्गावर सातारा शहराजवळील खिंडवडी येथे चारचाकी झायलो गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाने तीन- चार पलटी मारल्या. रिक्षाला बसलेली धडक एवढी भीषण होती की, झायलो गाडीच्या चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर खिंडवाडी येथे दुपारी पुणेकडून कराडकडे निघालेल्या लेनवरती झायलो गाडी क्र. (एमएच- 09- बीएम- 5990) रिक्षाला क्र. (एमएच- 11- एजी- 1121) जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षामध्ये असणारे दोन वृध्द व रिक्षा ड्राइवर किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावेळी चारचाकी झायलो गाडीमधील गाडी ड्राइवर आणि त्याच्याबरोबर गाडीत असलेली व्यक्ती गाडी जागीच सोडून पळून गेली आहे. अशा प्रकारची चर्चा खिंडवाडी परिसरात सुरू झाले आहे. खिंडवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. यानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रिक्षाचालकाने सदर घटना सांगितली.

Leave a Comment