औरंगाबाद | शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान काल सकाळी 9 ते 9:30 च्या सुमारास एका तरुणीने रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने काल सकाळी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेत रिक्षाचालकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली होती.
तरुणीच्या हातापायाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तरुणी ट्युशनला जात असताना हा प्रकार घडला.त्यानंतर पोलिसांनी तातडीने आपली चक्रे फिरवून त्या रिक्षाचालकाला अटक केली.
आनंद अंबादास पहुलकर (वय 50, वर्ष धंदा रिक्षाचालक रा. इंदिरानगर बाजीपुरा गल्ली नंबर 24 औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.