सोलापूर । काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील वैराग-उस्मानाबाद राज्य मार्गावरील मालेगांव येथील पाटील वस्ती जवळ रस्त्यांच्या दुतर्फा जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन गेल्याने वैराग, उस्मानाबाद , तुळजापूर वाहतूक बंद झाली आहे. यापूर्वी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागास सांगूनही दक्षता न घेतल्याने आणि रस्त्यांचे दोन्ही बाजुला मोठी चारी काढून न दिल्याने हा रस्ता उध्वस्त झाल्यचे प्रवाशी ग्रामस्थांचे मत आहे.
या तुफान पावसामुळे मालेगाव ओढ्या जवळ रस्त्यांचे दोन्ही बाजूने पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ओढ्याच्या पुलाखालून पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले पाईप उघडे पडून ओढया जवळ मोठे भगदाड पडले आहे. दगड गोटे, मुरूम व माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने रस्त्यांवर भळी पडल्या आहेत. झालेल्या पावसात या मार्गावरुन वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा नकळत ओढ्यातील पाण्याबरोबर वाहन जाऊन कोकणातील सावित्री सारखा मोठा धोका झाला असता.
वैराग हून मराठवाडयाला जोडणारा तुळजापूर , उस्मानाबाद मार्ग बंद झाल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.अनेक वर्षापासून खराब असलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराणे होते. मध्यंतरी अनेक आदोलनानंतर रस्त्यांची डागडुगी करण्यात आली होती. यानंतर वैराग पासून १२ कि.मि. रस्ता मंजुर केला आहे. या कामासाठी ३ कोटी, ९७ लाख, ६१ हजार रुपयाचा निधी मंजुर असून सदर काम भाग्यश्री कंन्ट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पण सरकारी धोरण, कोरोना महामारी यामुळे रस्त्यांचे काम रखडल्याने गेली अनेक वर्ष प्रवाशी व सर्वसामान्य जनतेला रस्त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असून उस्मानाबाद आगाराने बससेवा बंद करण्याचा देखील इशारा दिला होत. तरी तात्काल रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’