Tuesday, January 31, 2023

अतिवृष्टीचा फटका : प्रसिद्ध लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला लिंगमळा धबधब्याकडे जाणार वाहतुकीचा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या धबधब्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 23 इंच पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या दोन दिवसांपासून सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अतिवृष्टीचा जास्त फटका हा डोंगर, दऱ्या भागात राहणाऱ्या गावांना बसत आहे. तर सातारा जिल्ह्यातील धबधब्यांकडे जाणाऱ्या घाटमार्गात दरडी कोसळून अपघाताच्याही घटना घडत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी असा ठिकाणी जाणार्या रस्त्यावरून प्रवाशांना खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला लिंगमळा धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. या धबधब्याकडे जाणाऱ्या घाट मार्गावर ठिकठिकाणी दर्दी कोसळत आहेत. तर गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला असून येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. महाबळेश्वरच्या आतापर्यंतच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात जास्त विक्रमी पाऊस म्हणजे तब्बल २३ इंच तर दोन दिवसात ४२ इंच इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.