Saturday, March 25, 2023

एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी । देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद पेटला आहे. अनेक राज्यांमधून या कायद्याला विरोध होत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप सरकारकडून सर्रास गैर वापर केला जात असून, विशिष्ठ एका धर्मावर लक्ष केंद्रित करून गरिबांवर अन्याय केला जात आहे. तसेच पुण्यातील एल्गार परिषदेवर देखील पवारांनी भाष्य केलं आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 
पुढे बोलताना पवार म्हणाले, देशातील अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा हा खटाटोप आहे, या मध्ये सरकारकडून सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. तसेच एल्गार परिषदेबद्दल बोलताना पवार म्हणाले, कि या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला असल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची  चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी  केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार बरोबरच मागील राज्य सरकारावरही पवारांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ असल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) ने ठेवला असून या मुद्द्यावरून सरकारने या प्रकरणाची देखील चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याची मागणी  पवारांनी केली आहे.