जिल्ह्याभरात 47 लालपरींची चाके रस्त्यावर, ‘या’ मार्गावर झाल्या फेऱ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात तीन संपकरी कर्मचाऱ्यांना ‘बडतर्फ का करण्यात येऊ नये’ अशा नोटिसा बजावण्यात आल्या, तर दुसरीकडे चालू झालेल्या लाल परिणाम प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना लालपरिंचे चाके हळूहळू रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.

जिल्ह्यातील 5 आगारात मिळून एकूण 47 लालपरींनी 135 फेऱ्या करत 3 हजार 179 प्रवाशांनी प्रवास केला. एकूण 25 चालक आणि 21 वाहकांनी तसेच चार चालक तथा वाहक यांनी अशी एकूण 58 कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. मध्यवर्ती बस स्थानकावरून काल दिवसभरात औरंगाबाद पुणे मार्गावर 15 शिवशाही बस धावल्या यात 480 प्रवाशांनी प्रवास केला, तर नाशिक मार्गावर 6 शिवशाही बस ने 12 फेऱ्या केल्या‌. यात 98 प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय सिडको बस स्थानकातून जाण्यासाठी 10 लालपरी बसने 20 फेरे केल्या यात 641 प्रवाशांनी प्रवास केला.

तसेच औरंगाबाद-कन्नड मार्गावर 2 बसणे 8 फिऱ्या केल्या. यात 485 प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर 3 बसने 6 फेऱ्या केल्या. त्याचप्रमाणे औरंगाबाद-फुलंब्री दरम्यान 4 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. कन्नड आगारातून औरंगाबाद मार्गावर 2 बसने 8 फेऱ्या केल्या. गंगापूर आगारातून एका बसने औरंगाबाद मार्गावर दोन फेऱ्या केल्या. तसेच गंगापूर आगारातून वैजापूर मार्गावर एक बस आणि सोयगाव आगारातून अजिंठा लेणी साठी दोन शिवशाही, एक हिरकणी आणि चार लालपरी बस चालविण्यात आले आहेत.

Leave a Comment