औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेतील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे. कोरोना काळातही शहरवासीयांच्या सेवेत अविरत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे. मूळ वेतनावर तीन टक्के पगार वाढ अपेक्षित असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दर महिन्याला नियमित कर्मचारी अधिकारी व कंत्राटी कामगारांच्या वेतनापोटी मनपाला सुमारे 20 कोटी खर्च येतो. या पगारवाडी नंतर सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त भार मनपाच्या तिजोरीवर येणार आहे. सध्या मनपात साधारण वर्ग एकाचे 100 अधिकारी आहेत. वर्ग दोनचे 300, वर्ग 3 चे 1000 आणि वर्ग चारचे कंत्राटी कामगार मिळून ही संख्या साधारण साडेतीन हजारापर्यंत जाते. सध्या मनपात नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 28 हजारपर्यंत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वर्गावारीनुसार यात वाढ होत असून अधिकारी पदापर्यंत हा पगार साधारणपणे दीड लाखापर्यंत जातो. मनपा नियमित कर्मचाऱ्यांनी पेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अगदी समशान भूमी तीन कर्मचार्यांना पासून पाणीपुरवठा, घनकचरा, आरोग्य, करवसुली अशा विविध भागांचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. जल शुद्धीकरण केंद्र आणि पंपहाऊस यातील बहुतांश कर्मचारी हे कंत्राटी आहेत. या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ सोडा, पण त्यांचे पगारही नियमित होत नाहीत. त्यामुळे पगार वाढवून मागण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या पगारावर एजन्सीला कमिशन मिळते ते वेगळे. आपण कधीतरी नियमित होऊ या आशेपोटी हे कर्मचारी काम करत आहेत.




