औरंगाबाद : आरटीई प्रवेशासाठी कोट्यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी 23 जुलै ही अखेरची मुदत आहे. आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढवून देऊन ही 50% प्रवेश झाले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील 603 शाळांमधील 3 हजार 625 आरटीई जागांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला होता. 11 हजार 600 पालकांनी ऑनलाइन अर्ज केला होता. निकषामुळे प्रवेशात अडचणीत येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
पहिल्या फेरीत 3470 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी मिळालेल्या मुदत वाडीत 2 हजार 153 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शाळास्तरावर 1 हजार 355 तात्पुरते प्रवेश झालेत.