औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे असताना आणखीन एक प्रकरण शहारत समोर आले आहे. ४५ लाख रुपय घेऊन कापड दुकानाचे आउटलेट देतो असे खोटे आश्वासन देत. एका भामट्याने व्यापाऱ्याला तब्बल ५९ लाख २३ हजार रुपयाला गंडा घातला आहे.
प्राप्त माहिती नुसार, तक्रादार पंकज मदनलाल अग्रवाल रा. गारखेडा परिसर २०१८ साली त्यांची ओळख आरोपी असिफ आणि नितीन खन्नासोबत झाली. तेव्हा त्यांनी सांगितले कि ए. एन. रिल्स व्हेंचर्सकडून कॉटनवर्डचे आउटलेट घ्या. प्रति महिना ९० हजार किंवा विक्री मालाच्या १६ टक्के यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम तुम्हाला मिळेल असे अरोप्यानी अग्रवाल यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी प्रोझोन मॉल, निराला बाजार आणि पुणे या तीन ठिकाणी त्या त्या कापड दुकानाचे आउटलेट घेतले. या विषयावर करार देखील करण्यात आला.
दरम्यान, तक्रारदाराने त्या अरोप्यांना २०१९ मध्ये ४ महिन्याची कमाई कमिशन म्हणून दिली. व्यवसाय सुरळीत सुरु असताना २९ जूनला फ्रॅन्चाइजी रद्द झाल्याचा मेल आला. हिशोबानंतर उर्वरित रक्कम परत देऊ, असे आरोप्यांकडून त्यांना सांगण्यात आले. वारंवार मागणी केल्यावरही आरोपीनी डिपॉझिटची रक्कम ४५ लाख तसेच चार महिन्याच्या कमिशनची रक्कम मिळवून ५९ लाख २३ हजार दिलेच नाही. शेवटी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे धाव घेतली आणि अर्ज दिला. या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हा शाखेने केली आहे. तसेच उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरु आहे.