मुंबई मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास ‘या’ दिवशी सुरू; तिकीट दर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई मेट्रो 3 लवकरच धावण्यास सज्ज होणार आहे. 10 एप्रिल 2025 पासून मेट्रो 3 चा दुसरा टप्पा म्हणजेच आरे ते वरळी मार्ग सुरू होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता 36 मिनिटांत आरे ते वरळी पोहोचता येणार आहे, जे आधीच्या जास्त वेळाच्या प्रवासाच्या तुलनेत एक मोठा फायदा ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठी खुशखबर अन दिलासा मिळाला आहे. या मेट्रो 3 च्या मार्गावर महत्त्वाची ठिकाणे, जसे की सिद्धीविनायक मंदिर, दादर, धारावी, अन वरळी यासारख्या प्रमुख स्थानकांमध्ये एक गतीशील आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

मेट्रो 3 चा मार्ग –

मेट्रो 3 चा पहिला टप्पा 2024 च्या ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. आरे ते बीकेसी हा मार्ग 12.69 किमी लांब असून, यामध्ये 10 स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 अशा महत्त्वाच्या स्थानकांसह, मेट्रोचे स्थानक सुमारे 22 ते 28 मीटर जमिनीखाली असणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील आरे ते वरळी मार्गावर 10 एप्रिलपासून धावणाऱ्या मेट्रोसाठी धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धीविनायक मंदिर, वरळी, आणि आचार्य अत्रे चौक अशा प्रमुख स्थानकांचा समावेश असणार आहे. यासोबतच मुंबई मेट्रो 3 च्या मार्गिकेला मेट्रो 1, 2, 6 आणि 9 जोडली जाणार आहे. यामुळे प्रवास सोयीचा अन आरामदायी होणार आहे.

मार्गाचे एकेरी भाडे –

आरे कॉलनी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या संपूर्ण मार्गाचे एकेरी भाडे 60 रुपये असणार आहे. तिकीटाची किंमत अंतरानुसार ठरवण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो 3 च्या या नवीन मार्गाने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल अन प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ कमी होईल, हे निश्चित आहे.