नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब अशी आहे की या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिकांवर परिणाम झाला नाही. याबाबतची आकडेवारी भारतीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या पिकांच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांनी यापूर्वीच 91% तेलबिया, 83% ऊस, 82% डाळी, मका व ज्वारीसारखे धान्य 77%, आणि 31% पेक्षा जास्त गव्हाची कापणी केली आहे. हंगामाच्या सुरवातीला एकूण 697 लाख हेक्टर क्षेत्रापैकी शुक्रवारपर्यंत 390 लाख हेक्टरपेक्षा जास्त रब्बी पिके घेण्यात आली आहेत. डाळींच्या पिकाचे उत्पादन खूप चांगले झाले असून कापणी फार वेगाने सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. लवकरच कापणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
कृषी मंत्रालयाने दिलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारी 2020-21 मध्ये देशातील अन्न उत्पादनाचे सरासरी 303 मिलियन टन उत्पादन झाले असून ते मागील वर्षाच्या उत्पादनापेक्षा दोन टक्क्यांनी वाढले आहे. धान्य 120मेट्रिक टन, गहू 109 मेट्रिक टन, मका 30 मेट्रिक टन, हरभरा 12 मेट्रिक टन इतके उत्पादन झाले आहे.
रब्बी ते खरीप या पिका दरम्यान पेरलेल्या पिकांना जायद पिके म्हणतात. टरबूज, खरबूज काकडी, दुधी भोपळा, तुर, भेंडी, मूग,उडीद,सूर्यफूल, हिरवा चारा, वांगी, भोपळा, मिरची, कांदा, हिरव्या भाज्या यांचा यात समावेश होतो. कृषी मंत्रालयाच्या मते या जायद पिकांवर देखील करोना च्या दुसऱ्या लाटेचा कोणताही परिणाम झालेला नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group