कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कायदेशीर आधार नसताना बोगस नाव वापरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम स्वयंघोषित केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील करत आहेत. संघटनेची कोणतीही कागदपत्रे नसताना अधिकृत रजिस्ट्रेशन असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबाबत बेकायदेशीरपणे काहीही घोषणा करत आहेत. त्यामुळे या बोगस दोघांच्या विरोधात महाराष्ट्रात तक्रारी दाखल करणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बळीराजा शेतकरी संघटना ही रजिस्टर आहे, त्यामुळे तुम्ही या संघटनेत काम करा अशा भुलथापा देऊन केंद्रीय अध्यक्ष पंजाब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत होते. जेव्हा कार्यकर्त्यांच्या लक्षात आले ही संघटना रजिस्टर नाही, तेव्हा लढणारे कार्यकर्ते थांबले. कार्यकर्ते अडचणीत येऊ म्हणून अधिकृत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊ बागल, युवा प्रदेशाध्यक्षपद साजिद मुल्ला, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख, रमेश गणगे, रामदास खराडे अदिंनी पाठपुरावा करून संघटना रजिस्ट्रेशन करून घेतली.
परंतू कोणतेही कागदपत्रे नसताना कोणताही कायदेशीर आधार नसताना बोगस नाव वापरून शेतकऱ्यांची दिशाभूल पंजाब पाटील आणि बी. जी. पाटील हे करत आहेत. कागदपत्रे असणारी अधिकृत रजिस्ट्रेशन असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबाबत बेकायदेशीरपणे काहीही घोषणा करत आहेत. तेव्हा अशा बोगस लोकांच्या पासून शेतकऱ्यांनी सावध रहावे.